LIVE UPDATES

एकल महिलांच्या सर्वेक्षणासाठी वैभववाडी नगरपंचायतीत नोंदणीचे आवाहन

नगरपंचायत महिलांच्या पाठीशी : नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 20, 2026 16:20 PM
views 46  views

वैभववाडी : महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महिला धोरणा’ अंतर्गत वाभवे-वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात पात्र महिलांनी सहभागी होऊन आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांनी केले आहे.

या सर्वेक्षणामध्ये विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत तसेच १८ वर्षांवरील अविवाहित महिला यांचा समावेश करण्यात आला आहे. नगरपंचायत कार्यालय, वैभववाडी येथे १८ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत एकल महिलांची नोंदणी करणे सुरू आहे.नोंदणीसाठी अर्ज नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध असून, पात्र महिलांनी विहित मुदतीत कार्यालयात संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी वाभवे-वैभववाडी नगरपंचायत कार्यालयातील डीजेएसवाय विभाग (महिला व बालकल्याण विभाग) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच नोंदणीसाठी आधार कार्ड , रेशन कार्ड , शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र, बँक पासबुक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. दिव्यांग महिला असल्यास दिव्यांग प्रमाणपत्राची प्रत सादर करावी.एकल महिलांना शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ मिळवून देण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे असून, पात्र महिलांनी संधीचा लाभ घ्यावा. “एकटी नाही... आम्ही सोबत आहोत!” या भावनेतून नगरपंचायत महिलांच्या पाठीशी असून, जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करावी, असे आवाहन सौ. रावराणे यांनी केले आहे.