
देवगड : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांनी जिल्ह्यातील विवीध तालुका बाल विकास प्रकल्प कार्यालय तसेच विविध अंगणवाडी केंद्रांना भेटी देत महिला व बालविकास विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांचा समावेश होता.
या वेळी पंचायत समिती सावंतवाडीच्या सभापती सुस्मिता जाधव, लोकप्रतिनिधी, उपमुख्य कार्यकारी अधिकार प्रतीक उगारे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सावंतवाडी शैलजा मातोंडकर, मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महिला व बालकांच्या कल्याणासाठी अनेक शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येतील,असे सभापती अनुराधा नारकर यांनी यावेळी सांगितले.










