फोंडाघाट लोरे नंबर 1 मध्ये अनंत पिळणकरांनी केला प्रचाराचा शुभारंभ

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 31, 2026 18:15 PM
views 53  views

कणकवली : हळूहळू निवडणुकीची तारीख जवळ येतात तसे निवडणुकीत अधिकच रंगत पाहायला मिळत आहे उमेदवार वाडी वस्ती आणि घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत आज फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघात गेली अनेक वर्ष सत्तेत असणारे लोकप्रतिनिधी या मतदारसंघाचा विकास करू शकले नाहीत. विकास कुणाचा झाला हे जनता जाणते. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर मी जनतेजवळ मते मागत असून मतदार मताच्या रूपाने मला आशीर्वाद देईलच. सत्ताधाऱ्यांचा स्वार्थी हेतू सुद्धा या निवडणुकीत धुळीला मिळेल, अशा विश्वास फोंडाघाट जि प चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत पिळणकर यांनी व्यक्त केला.

फोंडा जिल्हा परिषद मतदार संघातील लोरे पंचायत समितीमध्ये श्री देव गांगो लोरे चाळा येथे फोंडा जिल्हा परिषद चे उमेदवार अनंत पिळणकर व लोरे पंचायत समितीच्या उमेदवार कीर्ती कृष्णा एकावडे यांचा प्रचाराचा शुभारंभ मंदिर मध्ये दर्शन घेऊन नारळ फोडून करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी गर्दी करून अनंत पिळणकर यांना विजयी करण्याचा निर्धार केला.

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर पारकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख सिद्धेश राणे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे फोंडा विभाग प्रमुख रमेश राणे, लोरे शाखाप्रमुख निलेश राणे, घोणसरीचे माजी सरपंच कृष्णा एकावडे, घोणसरी ग्रामपंचायत सदस्य सचिन सुतार, गौरव एकावडे, तनया तोरस्कर, स्वाती घाडी, दर्शन मराठे, विशाल राणे, संतोष चव्हाण, रामदास पाटकर, अमित लाड आदि उपस्थित होते.