असा नेता पुन्हा होणे नाही

सावंतवाडी - दोडामार्ग राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
Edited by: विनायक गांवस
Published on: January 31, 2026 13:40 PM
views 67  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजित पवार यांचे विमान अपघातात बारामती येथे निधन झाले, ही गोष्ट फारच धक्कादायक आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याचे शांतपणे ऐकून घेऊन काम करण्याचे एकदा ठरवल्यानंतर ते काम होऊनच जायचे असा खाक्या असलेला नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या निधनाने देशाचे व महाराष्ट्र राज्याचे मोठे नुकसान झाले आहे अशी भावना व्यक्त करत सावंतवाडी व दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने येथील कार्यालयात शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष उदय भोसले,पक्षाचे प्रदेश चिटणीस सुरेश गवस, सत्यजित धारणकर, एम.डी. सावंत, युवक कार्यकर्ते अनंतराज पाटकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, कामगार सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर शहर अध्यक्ष ऑगस्टीन फर्नांडिस, ॲड. सत्यवान चेंदवनकर, दीपक देसाई, गुरुदत्त कामात, नंदकिशोर नाईक, तालुका दोडामार्ग अध्यक्ष मेघेंद्र देसाई, नितेश पाटील, शहाजीराव भोसले, राम लाखे, डॉक्टर तुषार भोसले, सौ रंजना निर्मल, रामचंद्र निर्मल, शशिकांत तळवणेकर ,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.