LIVE UPDATES

झरेबांबरात रस्त्यावर कोसळले आकाशीचे झाड

रस्ता वाहतुकीस बंद
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 01, 2026 16:49 PM
views 39  views

दोडामार्ग :  झरेबांबर येथील चाळोबा देवस्थान परिसरात आकेशीचे मोठे झाड अचानक उन्मळून थेट रस्त्यावर कोसळल्याने वाहतुक कोंडी झाली. काही काळ दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर झाड बाजूला करून वाहतुक पूर्ववत करण्यात आली.

        गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी झाडे व फांद्या धोकादायक अवस्थेत आहेत. अशातच झरेबांबर येथे हे झाड कोसळल्याने राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व संबंधित यंत्रणेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाड रस्त्याच्या बाजूला हटविण्याचे काम तातडीने हाती घेतले. काही वेळानंतर अडथळा दूर करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान, या राज्यमार्गाच्या दुतर्फा असलेल्या धोकादायक झाडांची पाहणी तालुका आपत्ती व्यवस्थापनाने तातडीने करून ती हटविण्याची  मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.