
देवगड : जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा दहिबांव-प्रभुवाडी (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील क्रीडांगणासाठी 'दीक्षित फाऊंडेशन'च्या वतीने रु. ५१,०००/- ची आर्थिक देणगी प्रदान करण्यात आली आहे. या देणगीच्या माध्यमातून क्रीडांगणाच्या नामफलकाचा अनावरण सोहळा शनिवार दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता शाळेच्या प्रांगणात उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
दीक्षित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन नीळकंठ दीक्षित यांच्या हस्ते या नामफलकाचे उद्घाटन होणार आहे.विशेष उपस्थिती
या कार्यक्रमाला खालील मान्यवर विशेष उपस्थित राहणार आहेत: सदाशिव ओगले (पं. स. सदस्य) सचिन नाचणकर (सरपंच, ग्रामपंचायत दहिबांव बागमळा) सुरेश स. देवळेकर, सुनील बापट, जगदीश शिंदे (केंद्रप्रमुख, मिठबाब)
कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा दहिबांव-प्रभुवाडी यांच्या वतीने करण्यात आले असून, या नामफलक अनावरण सोहळ्याला सर्व समिती, अध्यक्ष, सदस्य, पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.










