LIVE UPDATES

कारचा अपघात झाला आणि गोवा बनावटीचं घबाड सापडलं

नाधवडे शेर्पे फाट्यावर मध्यरात्री अपघात
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 04, 2026 20:00 PM
views 49  views

साडेनऊ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

वैभववाडी : गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा नाधवडे येथील शेर्पे फाट्यावर अपघात झाल्यानंतर पोलिसांनी कारमधून गोवा बनावटीची दारू जप्त केली. या कारवाईत कारसह ९ लाख ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी सुदर्शन राजेंद्र गिते (वय २५) व सूरज सतीश लोंढे (वय २४, दोघे रा. शिरूर घाट, जि. बीड) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी गोव्यातून (एमएच४४यु ०४००)या कारमधून गोवा बनावटीची दारू घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होते. गुरुवारी (ता४ ) मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास नाधवडे येथील शेर्पे फाट्यावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन धडकली.

दरम्यान, ओरोस येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी मनोज भोसले हे रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांच्या निदर्शनास हा अपघात आला. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती वैभववाडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त कारची तपासणी केली असता त्यामध्ये ७५० मिली क्षमतेच्या गोवा बनावटीच्या दारूचे ३० बॉक्स आढळून आले. पोलिसांनी ५० हजार ४०० रुपयांची दारू आणि सुमारे ९ लाख रुपयांची कार असा एकूण ९ लाख ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार चंद्रकांत माने करीत आहेत.