LIVE UPDATES

मालवणात दीड-दोन वर्षांचा चिमुकला आढळला

पालकांचा शोध सुरू
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 03, 2026 13:47 PM
views 2999  views

मालवण : शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा आढळून आला. विशेष म्हणजे, हा मुलगा काही भटक्या कुत्र्यांनी घेरलेला असतानाही त्याला कोणतीही दुखापत झालेली नसल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

या मुलाचे पालक कोण आहेत, तो भरड परिसरात कसा पोहोचला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू असून नागरिकांकडूनही माहिती संकलित केली जात आहे.

पहाटेच्या वेळी एकटा चिमुकला आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित मुलाच्या पालकांनी अथवा नातेवाईकांनी तात्काळ मालवण पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.