LIVE UPDATES

नवरात्रोत्सवानिमित्त मालवणात रंगणार भजनांचा जागर

श्री भैरवी मंदिरात ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान भजन महोत्सवाचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 02, 2026 13:49 PM
views 31  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

मालवण : नवरात्रोत्सवानिमित्त मालवण शहरातील श्री देवी भैरवी मंदिर, संत सेना मार्ग, सोमवार पेठ येथे यंदाही पारंपरिक भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देवी भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळ, मालवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा भजन महोत्सव यंदा १४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज रात्री ८ वाजता विविध भजन मंडळांच्या सहभागातून हा भजन महोत्सव पार पडणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात भक्तिमय वातावरण निर्मिती करण्याबरोबरच मालवणातील पारंपरिक भजन संस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

११ ऑक्टोबर रोजी श्री अंदुर्लाई प्रासादिक भजन मंडळ, आंदुर्ले, १२ रोजी श्री ब्राह्मणदेव प्रसन्न भजन मंडळ, कांदळगाव-कातवड, १३ रोजी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, कातवड, १४ रोजी देवकी माता प्रासादिक भजन मंडळ, न्हिवे, तर १५ रोजी आकारी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, कांदळगाव-कातवड यांची भजने होणार आहेत. १६ ऑक्टोबर रोजी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, आनंदव्हाळ, १७ रोजी आई तुळजाभवानी ढोलकी भजन मंडळ, वायरी मालवण, १८ रोजी बाल दांडेश्वर भजन मंडळ, दांडी मालवण, १९ रोजी श्री देवी घुमडाई सातेरी प्रासादिक भजन मंडळ, घुमडे आणि २० ऑक्टोबर रोजी अष्टपैलू कलानिकेतन भजन मंडळ, मालवण यांचा सहभाग राहणार आहे.

या भजन महोत्सवाच्या माध्यमातून नवरात्रोत्सवात भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचा संगम अनुभवता येणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजनांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री देवी भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळ, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.