LIVE UPDATES

दुग्ध व्यवसाय वृद्धी अभियानांतर्गत किंजवडे येथे ६-सूत्री कार्यक्रम

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 08, 2026 18:06 PM
views 79  views

देवगड : देवगड तालुका दुग्ध व्यवसाय वृद्धी अभियानांतर्गत ६-सूत्री कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत किंजवडे आणि नंदिनी दुग्ध संस्थेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग तसेच दुग्ध संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या सावी लोके, सभापती गणेश राणे, जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर, जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्या संजना लाड, समृद्धी चव्हाण, सलोनी तडवडेकर, उपसरपंच पडावे, कृषी अधिकारी खराडे व मदने, डॉ. वंदना हेडाऊ, डॉ. आदिनाथ चव्हाण, पशुधन पर्यवेक्षक सचिन घाडी, सचिन पाटील, वैभव शारबिद्रे, ज्ञानराज मुंडे, के. बी. राणे, शीतल सहाणे, गायत्री राय, अभय करंबेळकर, गोकुळ संघाचे राजेश गावकर, परिचर विकास कदम तसेच आउटसोर्स व्हॅक्सिनेटर रोहित तेली यांची उपस्थिती होती.

दुग्ध व्यवसायाला चालना देणे, पशुपालकांचे उत्पन्न वाढविणे आणि पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमामुळे परिसरातील पशुपालकांना दुग्ध व्यवसायाबाबत मार्गदर्शन आणि आवश्यक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.