LIVE UPDATES

'मैत्रिणीच्‍या वाढदिवसाला जाते' सांगून गेली 'ती' घरी परतलीच नाही

22 वर्षीय तरुणी बेपत्ता
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 19, 2026 20:12 PM
views 138  views

कणकवली : हळवल येथील सोनाली श्रीधर ठाकूर (२२) ही तरुणी सोमवार, १९ मे रोजी सायंकाळी ७ वा. पासून राहत्‍या घरातून बेपत्ता झाली आहे. याबाबतची खबर तिचे कुटुंबिय विलास गजानन ठाकूर (४२, हळवल) यांनी कणकवली पोलीस ठाण्‍यात दिली. सोनाली ही 'मैत्रिणीच्‍या वाढदिवसाला जाते', असे सांगून घरातून बाहेर पडली होती, असे खबरीत म्‍हटले आहे.

तिची उंची ५ फुट ३ इंच, रंग सावळा, अंगाने सडपातळ, अंगात पांढरा सिवलेस कुर्ता व राखाडी रंगाची पँट आहे. उजव्‍या हातात लाल रंगाचा दोरा तर डाव्‍या हातात गुलाबी रंगाचे प्‍लास्‍टीकचे घड्याळ आहे. अशा वर्णनाची युवती आढळल्‍यास संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली पोलिसांनी केले आहे.