LIVE UPDATES

कर्जमुक्ती योजनेतून २,७५८ शेतकऱ्यांच्या खात्यात १४.४० कोटी जमा

आधार प्रमाणीकरण शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी ; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 06:58 PM
views 38  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सिंधुदुर्गनगरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २,७५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १४ कोटी ४० लाख ९३ हजार ६३ रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण ४ हजार ८१६ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली असून, त्यापैकी ३ हजार २९६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित १ हजार ५२० शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

या योजनेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात झाली. या बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था प्रदीप मालगावे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था अनिल चिकणे, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक ऋषिकेश गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रमोद गावडे तसेच राष्ट्रीयीकृत बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

योजनेच्या प्रसिद्ध झालेल्या यादीतील मृत शेतकऱ्यांच्या प्रकरणांबाबत मानक कार्यप्रणाली प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित बँकांनी मयत शेतकऱ्यांच्या वारसांशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. तसेच वयोवृद्ध शेतकरी आणि बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत संबंधित बँकांनी  संपर्क साधून ऑनलाइन तक्रारी नोंदविण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार कर्जवाटप करण्यात यावे. तसेच आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांपैकी अंगठ्याचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या शेतकऱ्यांनी प्राधान्याने आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#breaking news
कणकवली निम्मेवाडी ते चव्हाटा मंदिर पायवाटेचा ४० वर्षांचा प्रश्न मार्गी
October 21, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
आज धडा नव्हता पुस्तकातला, तर होता पाणी वाचविण्याचा
October 21, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
हिंदू खाटीक समाजातील नागरिकांसाठी स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना
October 21, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
आरोग्यसेवा बळकटीकरणासाठी पारुल युनिव्हर्सिटी, गोवा DHS एकत्र
October 21, 2026
संबंधित बातम्या