
कुडाळ : भारतातील नामांकित MRF टायर कंपनीमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या पुढाकाराने कुडाळ येथे MRF च्या गोवा, फोंडा येथील युनिटसाठी प्रशिक्षणार्थी पदांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महाभरतीद्वारे एकूण २५० जागा भरण्यात येणार आहेत.
नोकरीसाठी पात्रता आणि सुविधा :
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी किमान ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेतलेले असावे किंवा आयटीआय केलेले असावे. काही जागा पदवीधर (ग्रॅज्युएट) आणि डिप्लोमा धारकांसाठी राखीव आहेत.
वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना १७,५०० ते १९,००० रुपये पगार मिळेल.
इतर सुविधा : कंपनीकडून राहण्याची, कॅन्टीन आणि गणवेश (युनिफॉर्म)ची मोफत सुविधा दिली जाईल.
भविष्यातील संधी : प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना भविष्यात कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळू शकते, तसेच दरवर्षी पगारात वाढ केली जाईल.
मुलाखतीची माहिती :
स्थळ : बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था, एमआयडीसी कुडाळ
दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी २.३० पर्यंत.
या मुलाखतीदरम्यान कंपनीचे मॅनेजमेंट टीम उपस्थित राहणार असून, पात्र उमेदवारांना तात्काळ जॉब लेटर दिले जाईल. ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. जास्तीत जास्त सिंधुदुर्गवासी तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनसे सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार चौगुले (९३८४००३३०५) किंवा खांडेकर (९६९९२९०२२४) यांच्याशी संपर्क साधू शकतात.