
बांदा : निगुडे गावठणवाडी येथील शेत विहिरीतील सौर पंपाची अज्ञात व्यक्तीकडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार शुभलक्ष्मी गुरुनाथ सूर्यवंशी यांनी बांदा पोलीस ठाण्यात दिली आहे. निगुडे गावठणवाडी येथील सर्वे नंबर 109/45 जमिनीमध्ये विहीर असून विहिरीतून पाण्याचा उपसा करण्यासाठी सोलर सिस्टिम सहित व सोलर योजनेवर आधारित सौर कृषी पंप बसवण्यात आला होता. दिनांक 11/03/2026 रोजी हा पंप विहिरीमध्ये न दिसून आल्याने अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध बांदा पोलीस ठाणे इथं तक्रार करण्यात आली आहे.
या घटनेचा पंचनामा करताना निगुडे पोलीस पाटील सुचिता सुरेश मयेकर, शेतकरी केशव मयेकर, विठू गवंडे, अशोक विनायक धुरी मडुरा, शेत जमीन मालक शुभलक्ष्मी सूर्यवंशी तसेच विशेष कार्यकारी अधिकारी राजेश रमेश मयेकर पस्थित होते या चोरीची तपास लवकरात लवकर व्हावा असे आवाहन राजेश मयेकर यांनी केलं आहे.











