सावंतवाडीत संयुक्त योगोपचार शिबिर

Edited by: विनायक गांवस
Published on: December 01, 2024 12:08 PM
views 283  views

सावंतवाडी : पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग मार्फत सावंतवाडी शहरामध्ये संयुक्त योगोपचार शिबिर  गुरुवार  5 डिसेंबर 2024 ते 9 डिसेंबर 2024 दरम्यान होत आहे.  सकाळी 5:30 ते 7:30  या वेळेत दररोज 5 दिवसीय शिबिर संपन्न होणार आहे . 

 सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन, ऍडव्हान्स योग, आयुर्वेद  तसेच योगोपचार आणि आध्यात्मिक उन्नती बाबत विशेष वर्ग होतील.  या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठी विशेष मार्गदर्शन दिले जाईल. वैश्य भवन, गवळीतिठा, सावंतवाडी येथे शिबिर होणार आहे. सर्व योगाभ्यास प्रेमी  पुरुष, महिला तसेच लहान मुलांनी या योगशिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. योग शिबीर निःशुल्क आहे. त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा. 

अधिक माहितीसाठी  शेखर बांदेकर 9823881712,  महेश भाट 9975543446, रामनाथ सावंत 9423301475, अनिल मेस्त्री 9403560033 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.