LIVE UPDATES

Sawantwadi Health News : सिंधुदुर्गातील समस्यांवर आरोग्यमंत्र्यांच संवेदनशीलपणे लक्ष

ओएसडी डॉ. स्वप्नील सांगळेंची उपजिल्हा रुग्णालयासह पीएचसींना भेट : दीड हजारांच्या डॉक्टर भरतीत कोकणाला मिळेल प्राधान्य
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 17, 2026 04:22 PM
views 245  views
Dr Swapnil Sangle inspects healthcare facilities at Sawantwadi Sub District Hospital in Sindhudurg

सावंतवाडी : जिल्ह्यातील आरोग्य समस्यांवर आरोग्यमंत्र्यांच संवेदनशीलपणे लक्ष आहे. त्यामुळेच त्यांनी मला या सर्व गोष्टीचा सविस्तर आढावा आणि असलेल्या अडचणींची सर्व माहिती घेण्यासाठी पाठवले आहे. शासन स्तरावर त्वरित उपाययोजना करण्याच्या दृष्टीनेच आरोग्यमंत्र्यांनी मला पाठवल असून दोन दिवसापासून जिल्ह्यात आहे. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला आहे. डॉक्टरांची रिक्त पदे येणाऱ्या काळात भरली जातील. दीड हजार डॉक्टरांची भरती होणार असून त्यात कोकणाला प्राधान्य दिलं जाईल,  जास्तीत जास्त डॉक्टर्स उपलब्ध होतील व इतरही समस्या दूर होतील असा विश्वास आरोग्यमंत्र्याचे ओएसडी डॉ. स्वप्नील सांगळे यांनी व्यक्त केला. आज त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. स्वप्नील सांगळे यांनी सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयास देखील त्यांनी भेट दिली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी यांनी समस्यांकडे डॉ. सांगळे यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी प्रसुती विभाग, आयसीयू, ब्लड बँक, कॅज्युअल्टी, सीटी स्कॅन सेंटर सह विविध विभागांना प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. तेथील समस्या जाणून घेत आवश्यक सुचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, सभापती सुस्मिता जाधव, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, डॉ. संदीप सावंत, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. निखील अवधूत, नगरसेवक बाबू कुडतरकर, शर्वरी धारगळकर, ॲड सायली दुभाषी, सुरज परब आदींसह शिवसेना पदाधिकारी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी ओएसडी डॉ. सांगळे म्हणाले, स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मी समस्या जाणून घेतल्या असून काही गोष्टी तात्काळ सोडवण्यासाठी आवश्यक सुचना दिलेल्या आहेत.  प्रायव्हेट प्रॉपर्टीतील स्वच्छतेची व्यवस्थित निग्रानी केली जात नसल्याने त्यासंदर्भात नोटीस बजावण्यास सांगितले आहे‌. आयसीयू, ब्लड बँक, कॅज्युअल्टीतील समस्या दूर करण्यासाठी आवश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. डॉक्टर्सच्या स्पेशालिटीची उपलब्धता इथे असून ऑपरेशन थिएटर सुसज्ज आहे. लॅब टेक्निशियनसह अजून काही पद आवश्यक आहेत. ती स्थानिक स्तरावर किंवा महात्मा फुले योजनेअंतर्गत आपल्याला भरता येणार आहेत.

शासनांतर्गत पाठपुरावा करून बाकीचे पद भरण्यासाठी आपण त्वरित कारवाई करणार आहेत. आरोग्यमंत्र्यांचं या सर्व बाबतींवर अतिशय संवेदनशीलपणे लक्ष आहे. त्यांनी मला या सर्व गोष्टीचा सविस्तर आढावा घेण्यासह अडचणींची माहिती घेऊन शासन स्तरावरून त्वरित उपाययोजना करण्याच्या दृष्टीनेच मला इथे पाठवल आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात असताना प्रत्येक गोष्टीचा बारकाईने मी अभ्यास केलेला आहे. डॉक्टरांची पदे आणि वर्ग तीन, वर्ग चारची रिक्त पदे बघता वर्ग तीनची बहुतांश पदे जवळपास भरलेली आहेत. डॉक्टरांची पदे रिक्त आहेत ती येणाऱ्या काळात दीड हजार डॉक्टरांची भरती करणार आहोत त्यात उपाय योजना करून कोकणात जास्तीत जास्त डॉक्टर्स उपलब्ध होतील.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे पालकमंत्री नितेश राणे, आम.दीपक केसरकर, आम.निलेश राणे यांनी ज्या गोष्टींवर लक्ष वेधलंय त्यावर एकत्रित काम करण्यासाठी मला हा टास्क आरोग्य मंत्र्यांनी दिला आहे. त्यादृष्टीने बऱ्याच उपाययोजना तर स्थानिक पातळीवर आम्ही वर्कआउट केलेल्या आहेत. ज्या वरिष्ठ पातळीवरून, राज्य पातळीवरून काम करायचं आहे ते मुंबई गेल्यानंतर सर्व फॉलोअप घेऊन होतील. त्याचे रिजल्ट्स ग्राउंडवर दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भातला, स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याने जागेचा प्रश्न सुटलेला आहे. निधी आणि त्याची मान्यता तर झालेलीच आहे. आता सध्या जे कार्यान्वित रूम आहे त्याच्या शिफ्टिंगसाठीचे आम्हाला पर्यायी उपाययोजना काय करता येते, याचा थोडा अभ्यास चालला आहे. कारण, तिथे कन्स्ट्रक्शन करण्याच्या आधी तिथल्या सुविधा योग्य ठिकाणी कुठे हलवता येतील ? याचा विचार विनिमय चालू आहे. हे सगळं झाल्यानंतर एक सुसज्ज 100 बेडच स्पेशालिटी हॉस्पिटल येणाऱ्या काळात सावंतवाडीच्या आपल्या नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल, असा विश्वास डॉ. सांगळे यांनी व्यक्त केला.

तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून समस्या जाणुन घेतल्याबद्दल डॉ. सांगळे यांचे आभार मानले.‌ काही सुविधा १५ दिवसात पूर्ववत करण्यासाठी आवश्यक सुचना त्यांनी दिलेल्या आहेत. संपूर्ण मतदारसंघातील समस्या त्यांनी जाणून घेतल्या असून येणाऱ्या काळात आरोग्याचे प्रश्न निश्चितपणे मिटतील असा विश्वास श्री. परब यांनी व्यक्त केला.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#breaking news
पोलीस स्मिता माने मृत्यूप्रकरणी नवीन माहिती उघड
October 21, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
मिठबावमध्ये शिवलग्न सोहळा अन् सोने लुटण्याचा दिव्य उत्सव
October 21, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
कुणकेश्वर हायस्कूलच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड
October 21, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
उच्च शिक्षण घेऊनही झारापची हर्षदा शेतीत अव्वल
October 21, 2026
संबंधित बातम्या

View all

शिरवलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी आरोग्य व सल्ला शिबिर
October 17, 2026
Dr Swapnil Sangle and Sanju Parab inspect the proposed site for government quarters for doctors near Sawantwadi Hospital.
Sawantwadi Hospital News : डॉक्टरांना गव्हर्नमेंट क्वार्टर्ससाठी हालचाली, आरोग्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून पाहणी
October 17, 2026
सावंतवाडीतील भगवान महावीर दवाखान्यात दोन दिवसांत डॉक्टर उपलब्ध होणार
October 15, 2026
ग्रामपंचायत अणसूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात
October 15, 2026