
म्हापसा : ‘कोकण मराठी परिषद, गोवा’ तर्फे म्हापसा येथे संस्थेच्या मुख्यालय सभागृहात कोजागिरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव रविवारी २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे.
दरम्यान, हा कार्यक्रम ‘कोमप’च्या मुख्यालय सभागृहात (दिलखूश बि्ल्डिंग, दुसरा मजला, श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूला) होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन म्हापसा येथील नामवंत वकील तथा श्री बोडगेश्वर संस्थानचे अध्यक्ष ॲड. वामन पंडित यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने होणार असून, यावेळी प्रमुख वक्ता म्हापशातील योगशिक्षक, पत्रकार तथा माजी शिक्षक नारायण राटवड यांच्या हस्ते ॲड. वामन पडित यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पहार देऊन सत्कार केला जाणार आहे.
खोर्ली-म्हापसा येथीन महिला नाट्यकलाकार रेश्मा मठकर यांच्या संयोजनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुदेश आर्लेकर, कार्यवाह मेधा जाधव व कोषाध्यक्ष श्रीकांत साळगावकर यांची उपस्थिती असेल. उद्घाटन सत्रानंतर डॉ. प्रा. जेनेट फिलीप बोर्जिस यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक कोजागिरी कविसंमेलन होणार आहे. त्यानंतर नाट्यसंवादांचे सादरीकरण, गायन-वादनाचा समावेश असलेला सांगितिक कार्यक्रम, विनोदकथन यांचा समावेश असलेला विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. मसालायुक्न दुग्धप्राशनाने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








