LIVE UPDATES

पुरुषांमध्ये वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 14, 2025 16:20 PM
views 41  views

भारतात प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये होणाऱ्या कर्करोगांमध्ये सर्वात सामान्य आहे, जो प्रोस्टेट ग्रंथीमध्ये विकसित होतो. प्रोस्टेट ही मूत्राशयाच्या खाली स्थित एक ग्रंथी आहे आणि शुक्राणूंसाठी द्रव तयार करते. काही वर्षापूर्वी भारतात प्रोस्टेट कॅन्सर हा 11 व्या क्रमांकावरील कॅन्सर मानला जात होता. पण, आता हा कॅन्सर तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. या कॅन्सरचे वाढते प्रमाण पाहता पुरुषांना याची लक्षणे दिसताच वेळीच त्यावर उपचार सुरू करायला हवे. सुरूवातीला या कॅन्सरची लक्षणे खूप सौम्य दिसतात. हळूहळू हा कॅन्सर अवयवांमध्ये आणि हाडांमध्ये पसरतो आणि त्याचे रुपांतर मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात प्रोस्टेट कॅन्सरची साधारणे लक्षण काय आहेत.

पाठ, कंबरदुखी – प्रोस्टेट कॅन्सर वाढत असताना तो हाडांमध्ये पसरण्याची शक्यता अधिक असते. ज्यामुळे पाठ, कंबरेत सतत वेदना होतात. त्यामुळे तुम्हालाही दीर्घकाळापासून अशी काही लक्षणे दिसत असतील तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत.

लघवीतून रक्त येणे – प्रोस्टेट कॅन्सरचे लघवीतून रक्त येणे हे एक लक्षण आहे. काही वेळा रक्तस्त्राव कमी असून शकतो. पण, असे असले तरी याकडे दुर्लक्ष करू नये. वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत.

लघवीत बदल होणे – लघवीमध्ये बदल होणे हे प्रोस्टेट कॅन्सरचे लक्षण आहे. यामुळे पुरुषांना वारंवार लघवी होते, लघवी करताना त्रास होतो. कधी कधी जळजळही होते. त्यामुळे अशी लक्षणे असल्यास त्वरील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत.

लैंगिक समस्या – प्रोस्टेट कॅन्सरमुळे पुरुषांचे वजन कमी होते किंवा थकवा जाणवू शकतो. जर तुमचे कोणतेही कारण नसताना वजन कमी होत असेल तर हे प्रोस्टेट कॅन्सरचे लक्षण असू शकते.

प्रोस्टेट कॅन्सरचे निदान करण्यासाठी विविध चाचण्या देखील केल्या जातात

PSA रक्त चाचणी – प्रोस्टेट प्रतिजन PSA नावाचे प्रथिन तपासले जाते, जे प्रोस्टेट ग्रंथीद्वारे तयार होते.

डिजिटल रेक्टल परीक्षा (DRF) – तज्ज्ञमंडळी गुद्वारामार्ग (RETUM) प्रोस्टेट ग्रंथीची तपासणी करतात.

प्रोस्टेट बायोस्पी – प्रोस्टेट ग्रंथीमधून उतींचे नमुने घेण्यात येतात आणि त्यात कॅन्सरच्या पेशी आहेत का नाही हे तपासले जाते.