LIVE UPDATES

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून गिम्हवणे जि. प. शाळेची पाहणी

विद्यार्थ्यांशी साधला आपुलकीचा संवाद
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 23, 2026 09:06 PM
views 75  views
Maharashtra Chief Secretary Rajesh Agrawal interacts with students during his visit to Gimhavane Zilla Parishad School in Dapoli, Ratnagiri.

रत्नागिरी : राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दापोली दौऱ्यादरम्यान गिम्हवणे येथील जिल्हा परिषदेच्या आदर्श केंद्र शाळेला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला तसेच शाळेतील आधुनिक शैक्षणिक उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली.

दापोली नजीक असलेल्या या शाळेतील डिजिटल क्लासरूम आणि अद्ययावत डिजिटल स्टडी क्लासरूम असलेल्या 'आयडियल सेंटर'ला मुख्य सचिवांनी आवर्जून भेट देऊन माहिती घेतली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

वर्गात जाऊन मुख्य सचिवांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अभ्यासाविषयी विचारपूस केली. शाळेतील विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी करत त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक त्या सुविधांचा आढावा घेतला.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, केंद्रप्रमुख सुनील कारखिले यांच्यासह स्थानिक अधिकारी, शिक्षक उपस्थित होते.