सावंतवाडी : रोटरी क्लब संचलित रोटरी ट्रस्ट तर्फे फिजिओथेरपी सेंटर चालविण्यात येत असून ही सुविधा अत्यंत माफक दरात उपलब्ध दिली जात आहे. ही सेवा देण्यासाठी उच्च शिक्षित व अनुभवी फिजिओथेरपिस्ट सावंतवाडी शहरामध्ये प्रथमच उपलब्ध होत आहे.
साधले मेस समोरील रोटरी ट्रस्ट इमारतीत रविवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत मोफत फिजिओथेरपी पूर्वनिदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सर्व गरजूंनी याचा लाभ घ्यावा तसेच इच्छूकांनी विनया बाड ९४२१२२२९९९ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन रोटरी ट्रस्टचे सचिव सुधीर नाईक यांनी केले आहे.