सिंधुदुर्गनगरी : मागील सात वर्षांपासून आपल्या सिंधूदुर्ग जिल्ह्यात येऊन बालरुग्णांवर शस्त्रक्रिया करणारे प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ संजय ओक या येणाऱ्या नवीन वर्षात सुद्धा अधिक व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचावी या उद्देशाने महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे २४,२५,२६ जानेवारी रोजी बालरोग शल्यचिकित्सा शिबिरात शस्त्रक्रिया करणार आहेत.
मागील सात वर्षात साधारण १५० लहान मुलांवर सिंधुदुर्गात येऊन त्यांनी विनामूल्य तत्त्वावर शस्त्रक्रिया केलेली असून त्यात त्यांना लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय येथील बालरोग शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ पारस कोठारी आणि त्यांच्या टीम ची बहुमोल साथ लाभलेली आहे. हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसेल, अंडेसेंडेड टेस्ट्स सारख्या शस्त्रक्रिया महिला व बाल रुगणालय येथे होणार असून अधिक जटील आजारांवरच्या शस्त्रक्रिया सायन हॉस्पिटल येथे शासनाच्या महात्मा ज्योतिब फुले जनआरोग्य तथा प्रधानमंत्री जनआरोग्य योजने मार्फत करण्यात येणार आहेत.
तरी या उपक्रमाचा जिल्ह्यातील गरजवंत रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील , सुशीला गणेश निगुडकर ट्रस्ट चे डॉ संजय निगुडकर, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे उमेश गाळवणकर व या उपक्रमाचे समन्वयक डॉ अमेय देसाई यांच्या मार्फत करण्यात आली आहे.