
वेंगुर्ला : आकाश फीश मिल अँण्ड फिश ऑईल प्रा.लि कंपनी आणि एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हाॅस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार १७ जून व शनिवार २७ जून रोजी "महाआरोग्य शिबिराचे" आयोजन करण्यात आले आहे. १७ जून रोजी कुडाळ तालुक्यातील आदिशक्ती मंगल कार्यालय, भैरव मंदिर जवळ, मतकरीवाडी पाट याठिकाणी तर २७ जून रोजी वेंगुर्ला तालुक्यातील सुभद्रा मंगल कार्यालय, केळुस - कालवीबंदर रोड याठिकाणी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या आयोजित महाआरोग्य शिबिरांमध्ये विविध तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात जनरल मेडिसिन,कान, नाक, घसा, नेत्र विभाग, दंतचिकित्सा विभाग, स्त्रीरोग व प्रसुती विभाग, अस्थिरोग विभाग, बालरोग विभाग उपलब्ध असणार.त्याचप्रमाणे आवश्यक असल्यास ई.सी.जी, डायबेटिस तपासणी तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर आवश्यक तपासण्या केल्या जाणार आहे. तरी आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबीर तपासणीचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे तपासणी ला येते वेळी आभा कार्ड, आधार कार्ड आणि त्याला संलग्न मोबाईल नंबर घेऊन येणे. नाव नोंदणीसाठी ८३९०००५९९४/७७९८२९४०४८ या नंबरशी संपर्क साधावा असे आवाहन अयोजकांमार्फत करण्यात आले आहे.














