
सावंतवाडी : दंतवैद्यकीय क्षेत्रातील अचूक निदानासाठी अत्यंत आवश्यक असलेली अत्याधुनिक सीटी स्कॅन सुविधा आता सावंतवाडी शहरात उपलब्ध झालीय. 'एक्सप्लोअर डेंटल सीटी स्कॅन' केंद्र आता कार्यान्वित झाले असून सावंतवाडीतील हे पहिले सीटी स्कॅन केंद्र आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना उपचारांसाठी शहराबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. या सेंटरचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान संचालक डॉ. गजानन तार, डाॅ. मलिका तार यांनी केले आहे. या केंद्राचे उद्घाटन सावंतवाडी राजघराण्याचे युवराज लखमराजे सावंत भोसले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन सोहळ्यास डॉ. अभिजीत वझे, डॉ. सनील नाटेकर, डॉ. डामरेकर, डॉ. विनय सूर्यवंशी, डॉ. प्रवीण मसूरकर, डॉ. स्नेहल गोवेकर, डॉ. सिद्धार्थ परब, डॉ. निलेश बाणावलीकर, डॉ. सुयोग म्हाडगूत, डॉ. शरयू सावंत, डॉ. अपूर्वा पिंगुळकर यांच्यासह विनायक पारकर, नितीन पोकळे,संतोष चोडणकर, संतोष खानविलकर आदी उपस्थित होते. गांधी चौक येथील तारा हॉटेल समोर, दत्तात्रय निवास इमारत शॉप नं. जी 231/9 ग्राउंड फ्लोअर येथे हे सेंटर सुरू झाले आहे. या केंद्रामध्ये केअरस्ट्रीम 8200 हे अत्याधुनिक मशीन बसवण्यात आले आहे. याद्वारे हाय-रिझोल्यूशन CBCT, OPG आणि लॅटरल सेफ रेडिओग्राफ यांसारख्या महत्त्वाच्या चाचण्या एकाच छताखाली उपलब्ध झाल्या आहेत.
रुग्णांचा आणि डॉक्टरांचा वेळ वाचवण्यासाठी इथे रिपोर्टची डिजिटल डिलिव्हरी तत्काळ दिली जाते. अचूकता, जलद रिपोर्टिंग आणि रुग्णांचा आराम या त्रिसूत्रीवर आधारित हे केंद्र सावंतवाडी आणि परिसरातील दंतवैद्यांसाठी व रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे. मुखाचा कॅन्सर निदानासाठी देखील हे सेंटर उपयुक्त आहे. विशेष म्हणजे रविवारी देखील या सेंटरमध्ये सुविधा दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी 7030825762 या नंबरवर संपर्क साधावा.














