तोंड, ओठ आणि दातांचे रोग यावर घरगुती उपाय

Edited by: ब्युरो
Published on: January 31, 2024 12:20 PM
views 306  views

Health Tips : तोंडातील फोड, तोंड येणे, तोंडातले छाले यामुळे बरेचदा मोठा त्रास होतो. यावर घरगुती उपाय करून आराम मिळवू शकता, हे कसं  पाहूयात...


1) तोंडात छाले झाल्यास ज्येष्ठमधाची काडी चघळावी.

2) कथ्या बरोबर पेरुची पाने चावल्याने छाले बरे होतात.


हिरडयांतुन रक्त येणे

1)मीठ, हळद, आणि तुरटी समप्रमाणात घेऊन त्यांचे चूर्ण करून घ्यावे. या चूर्णाने मंजन करावे फार गरम किंवा फार थंड पेय घेऊ नये. गाजर, सफरचंद, आवळा यासारखी 2) फळे खावीत.

दात हलणे

1) तिळाच्या तेलात काळे मीठ वाटून हिरड्यांवर चोळल्याने दात हलायचे बंद होतात.

दात दुखणे

1) दात दुखल्यास थोडासा कापूर दुखणाऱ्या दाताखाली ठेवून दाबावे. दाढेत खड्डा असेल तर त्यात भरून द्यावे. वेदना बंद होतील.

2) दात दुखी असल्यास कच्चा पपई चे दुध, थोडेसे हिंग आणि कापूर मिसळून कापसाच्या बोळ्याने दुखऱ्या दातात ठेवून दाबावे.

3)लिंबाचा पाला घेऊन त्याचा रस ज्या बाजूची दाढ दुखत असेल त्या बाजूच्या कानात दोन थेंब टाकावे. लगेच आराम येतो.


पायरिया

1) आंब्याच्या कॊयीचा गराचे बारीक चूर्ण करून त्याचे मंजन केल्याने पायरिया बरा होतो.

2) लिंबाची फांदी पानां सकट सावलीत वाळवावी आणि जाळून बारीक वाटून घ्यावी. त्यात काही लवंग, पिपरमेंट आणि मीठ मिसळावे. सकाळ-सायंकाळ या चूर्णाने मंजन केल्याने पायरिया बरा होतो.

3) तोंडात किंवा श्वासात दुर्गंधी

जेवण झाल्यानंतर दोन्ही वेळा चमचाभर बडीशेप चघळल्याने तोंडाचा वास काही दिवसात जातो आणि पाचन क्रिया पण सुधारते.

4) तुळशीची चार पाने रोज खाऊन वरून पाणी प्यायल्याने तोंडाचा वास जातो.

5) एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून त्या पाण्याने रोज सकाळी चुळा भरल्यास, तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.

जेवणानंतर एक लवंग चघळल्याने तोंडाचा वास जातो.

6) डाळिंबाच्या सालीचे चूर्ण 4 ग्राम घेऊन फक्की मारावी व पाणी प्यावे. साल उकळून त्या पाण्याने चूळा भरल्याने सुद्धा तोंडाची दुर्गंधी जाते 

7) जिरे भाजून खाल्ल्याने तोंडाचा घाण वास जातो.

धने खाल्याने तोंडात सुवास येतो. जेवण झाल्यावर थोडे धने अवश्य खाल्ले पाहिजे.

8) एक चमचा आल्याचा रस 1 ग्लास  गरम पाण्यात टाकून त्याने चूळ भरल्यास तोंडाचा घाण वास जातो.

तोंडातली चव जाणे

9) एक लिंबू कापून त्याच्या अर्ध्या फोडीत दोन चिमूट काळे मीठ व मिरपूड शिंपडून लिंबाला आगीत थोडे गरम करावे. नंतर तो लिंबू चोखल्याने जिभेचा कडवतपणा जाऊन जिभेला चव येते व अपचन आणि गॅसेस पण बरे होतात.

10) तोंडात कडवटपणा असल्यास असेल तर डाळिंबाची साल पाण्यात उकळावे व त्यात थोडी बडीशेप टाकून चुळा भराव्यात.