“टीबी मुक्त भारत”साठी झारापमध्ये भव्य आयुष्मान आरोग्य शिबिर

15 एप्रिलला मोफत तपासण्या !
Edited by:
Published on: April 09, 2026 17:00 PM
views 15  views

कुडाळ : “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या संकल्पनेतून झाराप ग्रामपंचायत परिसरात आयुष्मान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत हे विशेष शिबिर दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत, जिल्हा परिषद शाळा क्र. 01 (झाराप ग्रामपंचायत जवळ) येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये 14 वर्षांवरील सर्व नागरिकांची छातीचा एक्स-रे तपासणी करण्यात येणार असून, त्याचबरोबर उच्च रक्तदाब (बीपी), मधुमेह (बीएसएल), महिलांचे हिमोग्लोबिन (HB), वजन, उंची तसेच आवश्यक त्या सर्व रक्त तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. आधुनिक सुविधांद्वारे टेलिकन्सल्टेशन, संशयित कुष्ठरोग तपासणी व IEC जनजागृती कार्यक्रम देखील राबविण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, या शिबिरात येणाऱ्या लाभार्थ्यांचे ई-कार्ड व आभा कार्ड देखील तत्काळ काढून दिले जाणार असून, सर्व तपासण्या व उपचार पूर्णपणे मोफत असतील. संपूर्ण शिबिर हे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

या व्यक्तींनी आवर्जून लाभ घ्यावा :

डायबेटिस रुग्ण, टीबी उपचार घेतलेले किंवा पूर्ण केलेले व्यक्ती, टीबी रुग्णांच्या संपर्कातील नागरिक, तंबाखू/गुटखा/दारू व्यसनाधीन व्यक्ती, कमी BMI (कुपोषित) असलेले, अस्थमा/निमोनिया/छातीचे आजार असलेले रुग्ण, वारंवार खोकला किंवा ताप येणारे, तसेच 60 वर्षांवरील सर्व नागरिक.

याशिवाय, कोणताही त्रास नसला तरी इच्छुक नागरिकांनाही एक्स-रे तपासणी करून दिली जाणार आहे.

सूचना : येताना आधार कार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे.

या उपक्रमामुळे झाराप परिसरात आरोग्याबाबत जनजागृती होऊन नागरिकांना वेळेवर निदान व उपचार मिळणार असल्याने, या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.