सिंधुदुर्ग : संजीवनी हॉस्पिटल, कणकवली व अथायु मल्टि-स्पेशालिटी हॉस्पीटल, कोल्हापूर यांच्यावतीने मोफत हृदयविकार, हाडाचे विकार, गुडघे लिगामेंट, कॅन्सर विकार, किडणी विकार, मुतखडा व प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन शिबीराच आयोजन करण्यात आले आहे. उद्या सोमवारी संजीवनी हॉस्पिटल, कणकवली कॉलेज रोड, लक्ष्मी विष्णू हॉल जवळ, कणकवली येथे सकाळी ११ ते १ या वेळेत हे मोफत शिबिर संपन्न होणार आहे.
यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड व आधार कार्ड धारकांच्या खालील शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. त्यामध्ये अँजिओप्लास्टी,बायपास शस्त्रक्रिया,मुतखडा, प्रोस्टेट, हाडाचे फ्रॅक्चर, अर्थोस्कॉपीद्वारे गुडघ्याचे लिगामेंट शस्त्रक्रिया , कॅन्सर शस्त्रक्रियांचा समावेश आहे. कॅम्पमधील सहभागी पेशंटची ६५००/- रुपयेची अँजिओग्राफी फक्त १००० मध्ये केली जाणार आहे. किडनी व प्रोस्टेट सोनोग्राफी फक्त - ३००/- मध्ये होईल तर हाडाचे एक्स-रे फक्त २००/- मध्ये काढले जातील. शिबीरामध्ये ज्या पेशंटना ऑपरेशन सांगितले आहे अशा पेशंटना हॉस्पिटलकडून मोफत बस सुविधा करण्यात येणार आहे. शिबिरास येताना आपले ओरिजनल रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन येणे तसेच आपले जुने सर्व रिपोर्ट घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोफत ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी या शिबिरात केली जाणार आहे. उद्या सकाळी 11 ते 1 या वेळेत संजीवनी हॉस्पिटल, कणकवली कॉलेज रोड, लक्ष्मी विष्णू हॉल जवळ, कणकवली येथे हे शिबिर संपन्न होणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.