जागतिक हृदयरोग दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2024 13:17 PM
views 41  views

सिंधुदुर्ग : जागतिक हृदयरोग दिनानिमित्त माधवबाग कणकवली मुख्य शाखेतर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मंगळवार दि.1 ऑक्टोबर 2024 वेळ सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आलंय. 

हृदयरोग, मधुमेह, कॅॉलेस्ट्रॉल वाढणे, उच्च रक्तदाब, असणाऱ्या रुग्णांसाठी माधवबाग कणकवली तर्फे मोफत तपासणी पुढील प्रमाणे होणार आहे ECG, ट्रेडमील टेस्ट (TMT), रँडम शुगर व ( हृदय रोगावर विनाशस्त्रक्रिया )उपचार तज्ञ डॉक्टराचे मार्गदर्शन पूर्णपणे मोफत मिळणार असून, या शिबिराचा लाभ सिंधुदुर्गवासियांनी घ्यावा, असे आवाहन कणकवली माधवबाग मुख्य शाखेतर्फे करण्यात आले आहे.


पत्ता : 

माधवबाग कणकवली श्रीधर गॅस एजन्सी नजीक कणकवली

संपर्क : 9373183888