LIVE UPDATES

सिंधुदुर्गात प्रथमच मोफत लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबीर

Edited by: विनायक गांवस
Published on: June 28, 2025 19:55 PM
views 91  views

सावंतवाडी : अथायु हॉस्पिटल कोल्हापूर, श्रीराम हॉस्पिटल कुडाळ व संजीवनी हॉस्पिटल, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ४ ते शनिवार दिनांक ५ जुलै  रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत अनुक्रमे कुडाळ व कणकवली येते मोफत लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.

या व्हेरिकोज व्हेन्स लक्षणेमध्ये पाय सुजणे,संध्याकाळी पाय दुखणे, पायामध्ये असहजता निर्माण होणे, असह्य वेदना होणे व त्यामुळे झोप न येणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे,पायाच्या नसा निळ्या होणे, पायाच्या नसा फुगीर होणे अशी लक्षणे असलेली रुग्ण शिबीर मध्ये सहभागी होऊ शकता, व्हेरिकोज व्हेन्स हा आजार पुरुषापेक्षा महिला मध्ये जास्त प्रमाणात असतो जसे की  गर्भधारणा, रजोनिवृत्ती ह्या काळात जास्त प्रमाण असते, जास्त वेळ उभे राहून काम करणारे कामगार, प्रमाणापेक्षा जास्त वजन असणे, ड्राइवर, कंडक्टर, नाभिक, किराणा दुकानदार, इस्त्री व्यवसायक ह्यांना जास्त प्रमाणात आढळतो तसेच लेसर उपचार पुढील फायदे पारंपरिक पद्धतीत व्हेरिकोज व्हेन्स ऑपरेशन गरज भासते, लेसर पद्धती मध्ये मात्र ऑपरेशन न करता रक्तवाहिनी लेसरनी गोठवली जाते, चिरफाड नसल्यामुळे लेसर पद्धती मध्ये कमी वेदना होतात, चिरफाड नसल्याने रुग्ण लवकर बरा होऊन कामावर लवकर रुजू होऊ शकतो शिबिरास येताना आपले सर्व जुने रिपोर्ट्स, आधारकार्ड व रेशनकार्ड घेऊन येणे तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मधील जास्तीत जास्त रुग्णांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सीईओ डॉ. बसवराज कडलगे यांनी केले आहे.