अरिहंत हॉस्पिटलमध्ये मायक्रा पेसमेकर यशस्वी

डॉ. प्रभू हलकट्टी व पथकाची कामगिरी : 70 वर्षीय रुग्णावर उपचार
Edited by:
Published on: June 22, 2024 13:49 PM
views 457  views

अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत अरिहंत हॉस्पिटलने अनेक दुर्मिळ आजारांवर यशस्वी उपचार करून रुग्णांना नवजीवन दिले आहे. नुकताच वर्षीय रुग्णावर मायक्रा पेसमेकर इम्प्लांटेशन प्रक्रिया करुन पुनर्जन्म देण्यात आला. त्यामुळे अरिहंत हॉस्पिटलने बेळगावसह उत्तर कर्नाटकात मनाचा तुरा रोवला असून यातून हॉस्पिटलची एक महत्त्वपूर्ण कामगिरी अधोरेखित होते. डॉ. प्रभू हलकट्टी यांच्या नेतृत्वाखाली कॅथ लॅब पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या बजावली.

सदर रुग्णाला काही दिवसांपासून त्रास होत होता. चक्कर येणे, 20 सेकंदासाठी शुद्ध हरपणे, यादरम्यान डोळे वरच्या दिशेने वळणे आदी समस्या होत होत्या. यामुळे रुग्णाला  तीनवेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यातच  वय ७० असल्याने गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले असते. पण डॉ. प्रभू हलकट्टी यांनी तरुग्णाच्या सर्व तपासण्या करून घेतल्या. संपूर्ण हार्ट ब्लॉक असल्याचे निदान दिसून आले. यामुळे धोका पत्करून उपचार करण्याचा निर्णय घेऊन डॉ. प्रभू हलकट्टी व सहकाऱ्यांनी सदर रुग्णाला मायक्रा पेसमेकर बसविण्यात आले. 

सुरुवातीला हृदय ठोके कमी असल्याने रुग्णाला पेसमेकर बसविण्याची गरज होती. त्यामुळे डीडीडीआर (ड्युअल चेंबर सेंट ज्यूड्स पेसमेकर)चे रोपण करण्यात आले. पण जखमेला संसर्ग झाल्यामुळे पुन्हा हॉस्पिटलमध्ये दखल करून उपचार करण्यात आले.  पण काही दिवसांनंतर पुन्हा त्रास सुरू झाल्याने तिसऱ्यांदा दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णाला कायमस्वरूपी पेसमेकर बसविण्याची आवश्यकता होती.  मात्र पुनर्रोपण केल्यानंतर संसर्ग होण्याच्या जोखमीमुळे रुग्णासाठी मायक्रा पेसमेकरचा पर्याय निवडला. जो कमी त्रासाचा  आणि प्रगत तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो. ही अभिनव प्रक्रिया डॉ. प्रभू हलकट्टी, डॉ. अंबरीश नेर्लीकर व कुशल कॅथ लॅब पथकाचच्या कौशल्याने यशस्वीरीत्या पार पडली. सहकाररत्न रावसाहेब पाटील, संचालक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून रुग्णाची विचारपूस करत डॉक्टर व पथकाचे कौतुक केले.

मायक्रा पेसमेकर प्रक्रिया 

मायक्रा पेसमेकर हे हृदयाचे ठोके कमी किंवा अनियमित लय असलेल्या रुग्णांसाठी विकसित केले आहे. यामुळे याचा रुग्णांना मोठा लाभ होतो. तसेच संसर्गाचा धोका कमी व हृदयाला पुनर्प्राप्ती ठोके गतिमान होतात. त्याचबरोबर लीड्सशिवाय ते विस्थापन किंवा फ्रॅक्चरसारख्या गुंतागुंत कमी करते. दीर्घकालीन विश्वासार्हता सुनिश्चित करून बॅटरीचे आयुष्य 12 वर्षांपर्यंत वाढू शकते.