कणकवली : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे "आपला दवाखाना' ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना आहे. तशीच ती उत्तमरित्या यशस्वी देखील झाली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात "आपला दवाखाना' चे रुग्णालय सुरू करण्यात आले. कणकवली तालुक्यात देखील पंचायत समिती नजिक "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरू करण्यात आला. या दवाखान्याची जुनी वेळ दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत होती त्यावेळेस आता बदल झाला असून आता सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
आपला दवाखाना कणकवली येथे रुग्णसेवेसाठी १० ऑगस्ट २०२३ रोजी सुरू झाला. मात्र काही कमी प्रमाणात नागरिकांना या ठिकाणी मिळणाऱ्या सेवा सुविधा समजल्या नाहीत. मात्र आपला दवाखाना येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपला दवाखाना सकाळी ९ ते सायं. ५ यावेळेत सेवा देणार आहे. तसेच "आपला दवाखाना' सुरू झाल्यापासून १२१४ लोकांनी या ठिकाणी उपचार घेतले आहेत.
ज्या प्रमाणे खासगी रुग्णालयात पैसे देऊन रक्ताच्या तपासण्या केल्या जातात. मात्र आपला दवाखाना येथे सर्व तपासण्या विनाशुल्क केल्या जात आहेत. तसेच त्यावर योग्य निदान देखील केले जाते. विशेष करून डायबिटीस, ब्लड प्रेशर, यासारखे ऋण देखील तपासणीसाठी येतात अशी, माहिती डॉ. श्री. गोसावी यांनी दिली.