LIVE UPDATES

सावंतवाडीत भव्य 'मेगा मेडिकल स्पेशालिटी' तपासणी शिबिर उत्साहात

Edited by: विनायक गांवस
Published on: March 24, 2026 16:22 PM
views 245  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हा दुर्गम भाग असल्याने येथील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतात. ही उणीव भरून काढण्यासाठी आणि जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकातील रुग्णांना सर्व प्रकारच्या स्पेशालिटी सेवा एकाच छताखाली मिळाव्यात, या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आज 'मेगा मेडिकल स्पेशालिटी' तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर आता दर तीन महिन्यांनी घेण्यात येणार आहे.


या आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य, नगरसेवक देव्या सुर्याजी तसेच शासकीय महाविद्यालयातील अनेक तज्ज्ञ  डॉक्टर्स डॉ. सागर कोल्हे (मूत्रविकार तज्ज्ञ), डॉ. अनिकेत वजराटकर (जनरल सर्जन),डॉ. पल्लवी देशमंतार (जनरल सर्जन)* रेडिओलॉजिस्ट डॉ. हर्षल जाधव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश करतसकर आणि तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, सामाजिक बांधीलकी' संघटनेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, प्रा. रवी जाधव, रूपा मुदराळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे आणि सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


 पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे इतर जिल्ह्यांतून स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच शिबिरासाठी आवश्यक २डी इको (2D Echo) आणि सोनोग्राफी मशीन्सचीही व्यवस्था करण्यात आली होती. शिबिरात सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालयातील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली, ज्यामध्ये प्रामुख्याने

डॉ. सागर कोल्हे (मूत्रविकार तज्ज्ञ) डॉ. अनिकेत वजराटकर (जनरल सर्जन) डॉ. पल्लवी देशमंतार (जनरल सर्जन) यांसारख्या तज्ज्ञांचा समावेश होता. याशिवाय रेडिओलॉजिस्ट डॉ. हर्षल जाधव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश करतसकर आणि तालुका आरोग्य अधिकारी देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत आणि आभार प्रदर्शन वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले. या शिबिरामुळे जिल्ह्यातील शेकडो रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा घरबसल्या उपलब्ध झाली आहे.

आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात आली. स्थानिक आरोग्य शिबिरामध्ये विविध नामांकित रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग दर्शवत शेकडो रुग्णांची मोफत तपासणी केली. या शिबिरामध्ये हृदयविकार, नेत्ररोग, आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी हृदयविकार विभाग: डॉ. निर्मला सावंत (हृदयरोग तज्ज्ञ) यांनी ४२ रुग्णांची 2D Echo तपासणी केली. तसेच कणकवली येथील डॉ. पोफळे आणि SSPM हॉस्पिटलचे डॉ. माळकर यांसारख्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कर्करोग तपासणी डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलच्या पाच डॉक्टरांच्या टीमने रुग्णांची कर्करोग संदर्भात सखोल तपासणी करून पुढील उपचारांसाठी मोलाचा सल्ला दिला. नेत्ररोग विभाग सुदर्शन नेत्र रुग्णालय, झोंबळी येथील तज्ज्ञ डॉ. वाघ यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली.बालरोग विभाग ठाणे येथील KIMS हॉस्पिटलचे पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. श्रीनिवास आणि डॉ. विशाल गावडे यांनी बालरुग्णांची तपासणी केली.

शिबिरात खालील तज्ज्ञांनी देखील आपली सेवा दिली. औषध वैद्यकशास्त्र: डॉ. आदित्य भैय्या, मानसोपचार: डॉ. संदीप खुडे

अस्थिव्यंगोपचार: डॉ. सौरभ पाटील

स्त्रीरोग तज्ज्ञ: डॉ. मंथन शहा

दंतशल्य: डॉ. शरयू सावंत

नाक, कान, घसा तज्ज्ञ: डॉ. श्याम राणे इतर तज्ज्ञ डॉ. धनंजय भोसले (नेत्रशल्य), डॉ. ओमकार जाधव (भुलतज्ज्ञ), डॉ. रुपेश जाधव (रेडिओलॉजिस्ट) आणि डॉ. विशाल रेड्डी (फिजिशियन) यांनी सेवा दिली. 

या शिबिरामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना एकाच छताखाली विविध तज्ज्ञांचा सल्ला आणि उपचार मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.