ब्युरो न्युज : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची दमदार सुरूवात झाली आहे. हास्यमय वातावरणात आयपीएलचे सामने खेळवले जात आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामना झाल्यावर खेळाडू मनमोकळ्या गप्पा मारताना दिसतात. तर अनेक इंटरव्ह्यू देखील घेतले जात आहेत. अशातच एका मुलाखतीत चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अष्टपैलू खेळाडू आणि महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) राईट हॅन्ड म्हणून ओळख असलेल्या सर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने मोठं वक्तव्य केलं आहे.
उर्वशी रौतेला हिचं नाव अनेकदा टीम इंडियाचा जखमी खेळाडू ऋषभ पंत याच्यासोबत घेतलं जातं, मात्र यादरम्यान रवींद्र जडेजाने सर्वात सेक्सी अभिनेत्री म्हणून तिचं वर्णन केलंय. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या हॉटनेस आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तिचं नाव सतत चाहत्यांमध्ये चर्चेत असतं. अशातच आता रविंद्र जडेजाने उर्वशीचं कौतूक केलंय.