बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 2012 साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘ओह माय गॉड’ चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. आजही प्रेक्षक आवडीने हा चित्रपट पाहतात. दरम्यान, आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रदर्शित होणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने एक पोस्टर शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुता वाढली होती. दरम्यान, अशातच अनेकांनी अक्षय कुमारला सोशल मीडियावरुन मोठा इशारा दिला आहे.
अक्षय कुमारचा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तर 11 जुलै रोजी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेकांना त्याला सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. कारण, याआधी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र, आदिपुरुष या चित्रपटांमुळे कळत-नकळत हिंदू धर्माचा अपमान करण्यात आला. ज्यामुळे हे चित्रपट वादाचा विषय ठरले. ‘ओह माय गॉड 2’चित्रपटात अक्षय भगवान शंकराची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे ही भूमिका साकारताना त्याच्याकडून हिंदू धर्माचा अपमान होऊ नये असा इशारा नेटकऱ्यांनी अक्षयला दिला आहे.
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून अक्षयचा हा चित्रपट ओटीटीवरुन प्रदर्शित केला जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, आता हा चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रायने केलं आहे. हा चित्रपट भारतातील लैंगिक शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे.
‘या’ चित्रपटात दिसणार अक्षय
‘ओह माय गॉड 2’ व्यतिरिक्त अक्षय ‘हेरा फेरी 3′,’वीर दौडले सात’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे. अक्षयचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करतील की नाही याकडे सर्वांचेच लक्ष असेल.