'अपक्ष' सदस्य भाजपच्या गोटात ?

Edited by: विनायाक गांवस
Published on: February 09, 2026 22:13 PM
views 326  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती अपक्षांचा बोलबाला पहायला मिळाला. जिल्हा परिषद ३ तर पंचायत समितीत ५ बंडखोर अपक्षांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची दाणादाण उडवून दिली. मात्र, निवडून आल्यानंतर हे अपक्ष भाजपच्या गोटात सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे 

विजयानंतर जल्लोष करताना यातील काही अपक्षांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा दैवत असा आशय असणारे पोश्टर हाती घेत गुलाल उधळला. त्यामुळे भाजपा तून बंडखोरी करत भाजप तसेच शिवसेनेच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारून हे अपक्ष पुन्हा भाजपात सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यात सोशल मीडियावरील फोटो, अपक्ष उमेदवारांची विधान चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे अपक्षांच्या पुढील भुमिकेकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहिले आहे