माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतले आंगणेवाडीच्या देवी भराडीचं देवीचं दर्शन

Edited by:
Published on: February 09, 2026 20:45 PM
views 40  views

कुडाळ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या पत्नीसह श्री भराडी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर वैभव नाईक यांनी जत्रोत्सवाच्या परिसरात विविध उपक्रमांना भेटी दिल्या. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या माध्यमातून भाविकांसाठी राबविण्यात आलेल्या मोफत पाणी वाटप  स्टॉलला त्यांनी भेट दिली व स्वतः पाणी वाटप करत या उपक्रमाचे कौतुक केले. कडक उन्हात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळत आहे.

वैभव नाईक यांनी जत्रोत्सवात कार्यरत असलेल्या मसुरे-पोईप आणि आंगणेवाडी शिवसेना शाखेला भेट दिली. तेथील शिवसैनिकांशी संवाद साधून त्यांनी उत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या निमित्ताने मालवण परिसरात सध्या भक्तिमय वातावरण असून राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची देखील मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे.