विधू विनोद चोप्रा यांचा आगामी चित्रपट '12 वी फेल' ची घोषणा

विक्रांत मॅसी साकारणार मुख्य भूमिका
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 24, 2022 16:09 PM
views 227  views

ब्युरो न्यूज : असे म्हटले जाते की भारतातील प्रत्येक गल्लीत, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात एक विद्यार्थी आहे, ज्याचे आयएएस (IAS) किंवा आयपीएस (IPS) अधिकारी बनण्याचे स्वप्न असते. अशातच, विधू विनोद चोप्राचा आगामी चित्रपट या विद्यार्थ्यांवर आधारित आहे. 'परिंदा', '1942: अ लव्ह स्टोरी', 'मिशन कश्मीर', 'मुन्नाभाई फ्रँचायझी', '3 इडियट्स' आणि 'पीके' यांसारखे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणल्यानंतर,फिल्ममेकर आता '12वी फेल' चे दिग्दर्शन आणि निर्मिती करत आहेत, जे अनुराग पाठक यांच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या नॉव्हेलवरून रूपांतरित आहे.


हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या वास्तविक जीवनातील कथेवरून प्रेरित आहे. पण '12वी फेल' हे चरित्र नसून, पुरुष किंवा स्त्री प्रामाणिकपणे कसा बदल घडवू शकतात याचे एक सामर्थ्यचित्र आहे. '12वी फेल' हा पहिला चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण मुखर्जी नगर, नवी दिल्ली येथे झाले आहे, जिथे ब्यूरोक्रेट्सच्या पिढ्या जन्मल्या आहेत.


चित्रपटाबद्दल बोलताना व्ही.व्ही.सी. म्हणाले, "जर प्रामाणिक व्यक्ती सत्तेच्या पदावर असेल तर जग खरोखर बदलू शकते. हा चित्रपट लिहिण्याच्या प्रक्रियेत मी असंख्य आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांसोबत आलो आहे. जर हा चित्रपट आणखी 10 अधिका-यांना प्रामाणिकपणेसाठी प्रयत्न करण्यास प्रेरित करू शकतो, तसेच आणखी 10 विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेसाठी प्रेरणा देऊ शकतो तर मला विश्वास आहे की मी यशस्वी झालो आहे." 


या चित्रपटात विक्रांत मॅसी मुख्य भूमिका साकारणार असून, याबाबत बोलताना विक्रांत म्हणाले, "प्रामाणिकपणा दुर्मिळ झाली आहे आणि ही आपल्या काळची शोकांतिका आहे. हा चित्रपट स्वप्न पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, तसेच सर्व प्रामाणिक अधिकाऱ्यांना समर्पित आहे जे आपल्या देशाचा आणि संविधानाचा कणा आहेत. व्हीव्हीसीसोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून, एक मोठे आव्हान आहे कारण तो एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहे."


व्हीव्हीसीने '12वी फेल'चे पहिले शेड्यूल चंबळमध्ये पूर्ण केले असून सध्या दिल्लीत दुसऱ्या शेड्यूलचे चित्रीकरण सुरू आहे. हा चित्रपट २०२३मध्ये उन्हाळ्यात प्रदर्शित होणार आहे.