'कुत्ते' चित्रपटाच्या 'मेहफिल-ए-खास' मध्ये दिग्गज कलाकारांचा सहभाग

गुलजार, विशाल भारद्वाज आणि रेखा भारद्वाज या दिग्गज कलाकारांनी घेतला सहभाग
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 11, 2023 16:27 PM
views 281  views

मुंबई : आसमान भारद्वाज आगामी केपर थ्रिलर चित्रपट 'कुत्ते'द्वारा दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज असून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच, चित्रपटाच्या रिलीजपूर्वी निर्मात्यांनी मुंबईत 'मेहफिल-ए-खास' या भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गीतकार-लेखक वरुण ग्रोव्हरद्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून एमीने याचे सूत्रसंचालन केले होते.


या कार्यक्रमात चित्रपटाचे कलाकार अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन, शार्दुल भारद्वाज ते आसमान भारद्वाज, विशाल भारद्वाज, गुलजार सहाब, रेखा भारद्वाज, लव रंजन, अंकुर गर्ग, आणि भूषण कुमार यांच्यासह टीमसोबत इतर सदस्यही उपस्थित होते. तसेच, या भव्य कार्यक्रमात विशाल भारद्वाज, गायिका रेखा भारद्वाज आणि प्रख्यात गीतकार गुलजार सहाब यांचे लाईव्ह परफॉर्मन्स देखील पाहायला मिळाले.


रेखा भारद्वाज यांनी कार्यक्रमात 'ओंकारा' चित्रपटातील 'नमक इश्क का' गाण्यावर सुंदर परफॉर्मन्स दिला. यासोबतच त्यांनी 'पानी पानी रे', 'एक वो दिन', 'रॉन दो' यांसारख्या गाण्यांसह 'कुत्ते' सिनेमाचे टायटल ट्रॅकही गायले. तसेच, 'कुत्ते' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणार्‍या आसमान भारद्वाजने आपल्या दिग्दर्शनाच्या पदार्पणाबद्दल सांगितले आणि न्यू एज सिनेमासह विशाल जी, रेखा जी आणि गुलजार सहाब यांच्या कथांबद्दल आपले विचार देखील व्यक्त केले. 


विशाल भारद्वाज यांनी 'इश्किया' चित्रपटातील 'दिल तो बच्चा है जी' हे गाणे अर्जुन कपूरला डेडिकेट केले. तसेच राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज यांनी विशाल जी आणि रेखा जी यांना 'कमिने' चित्रपटातील त्यांचे सर्वात आवडते गाणे 'पहली बार मोहब्बत की है' गाण्याची विनंती केली.


या चित्रपटातील 'फिर धन ते नान' आणि 'आवारा डॉग्स' ही दोन चार्ट-टॉपिंग गाणी प्रेक्षकांच्या भेटीला यापूर्वी आली आहेत. अशातच, 'मेहफिल-ए-खास'या कार्यक्रमामध्ये चित्रपटातील उर्वरित गाण्यांचे विशेष स्क्रीनिंग एलईडीवर करण्यात आले होते. 'तेरे साथ'हे नवीन गाणे देखील या कार्यक्रमाचा एक भाग होता.


लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मित, आणि आसमान भारद्वाजद्वारा दिग्दर्शित, 'कुत्ते'हा चित्रपट गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारा प्रस्तुत आहे. तसेच, या चित्रपटाला संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले असून गुलजार सहाब यांनी गीते लिहिली आहेत. 'कुत्ते'हा चित्रपट या शुक्रवारी 13 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.