
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता- निर्माता तथा टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेपैकी एक असलेल्या ओम नमः शिवाय या मालिकेचे दिग्दर्शक धीरज कुमार यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. सोमवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अंधेरी येथील कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि त्यांचे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
मिडिया रिपोर्टनुसार, धीरज कुमार यांना न्यूमोनिया झाल्याचे सांगण्यात येत आहे. काल रात्री त्यांची प्रकृती खूपच गंभीर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान उपचारादरम्यान, त्यांचे रुग्णालयात निधन झाले. बाॅलीवूडमध्ये त्यांचा मोठा दबदबा होता, धीरज कुमार यांच्या निधनाची बातमी ऐकताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
धीरज कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही दीर्घकाळ दबदबा राखला. विशेषतः १९९७ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या 'ओम नमः शिवाय' या पौराणिक टीव्ही मालिकेच्या दिग्दर्शक म्हणून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.
देवदर्शन घेऊन घरी आल्यानंतर धीरज कुमार यांना १४ जुलै रोजी रात्री त्रास जाणवू लागला. त्यांची प्रकृती खूपच खराब झाली त्यामुळे त्यांना कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांना कृत्रिम जीवरक्षक प्रणाली- व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाल्याने व्हेंटीलेटर काढावे लागले आणि सिनेरसिकांसमोर वाईट बातमी आली. मृत्यूसंदर्भात कुटुंबियांकडून गोपनीयता राखण्याची विनंती करण्यात आली होती, त्यामुळे काही काळ या अभिनेत्याच्या मृत्यूबाबत कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत विधान आले नव्हते, आता मिडिया रिपोर्टनुसार,त्यांच्या बातमीचे वृत्त समोर आले आहे.