वेंगुर्ला : वेंगुर्ला येथे झालेल्या स्व. प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘ढ‘ मंडळी-पिगुळी यांच्या ‘वाल्मिकी‘ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. या मंडळाला रोख १० हजार आणि फिरता तसेच कायमस्वरुपी चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
बी.के.सी.असोसिएशन मुंबई पुरस्कृत व स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ७ व ८ जानेवारी रोजी येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहात पार पडल्या. या स्पर्धेत विवेकानंद कॉलेज-कोल्हापूर यांच्या ‘चफी‘ या एकांकिकेने द्वितीय, कलासक्त मुंबईच्या ‘ओल्या भिती‘ एकांकिकेने तृतीय तर वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान, कणकवलीच्या ‘स्वगत स्वगते‘ या एकांकिकेने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. यांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार व २ हजार तसेच कायमस्वरुपी चषक देण्यात आले. वैयक्तिक बक्षिसांमध्ये दिग्दर्शन प्रथम-शंतनू पाटील (चफी), द्वितीय-तेजस म्हसके व विठ्ठल तळवलकर (वाल्मिकी), तृतीय-योगेश कदम (ओल्या भिती) यांनी पटकाविला. यांना अनुक्रमे १ हजार, ७५०, ५०० रोख व चषक देण्यात आले. पुरुष अभिनय - प्रथम-रमेश घाडी (वाल्मिकी), द्वितीय-यश शिदे (चफी), तृतीय-योगेश जळवी (मधुमाया) यांनी पटकाविला. यांना अनुक्रमे १ हजार, ७५०, ५०० रोख व चषक देण्यात आले. स्त्री अभिनय - प्रथम - श्रद्धा परब (वाल्मिकी), द्वितीय-मंगल राणे (स्वगत स्वगते), तृतीय-धनश्री गाडगीळ (आधे-अधुरे) यांनी पटकाविला. यांना अनुक्रमे १ हजार, ७५०, ५०० रोख व चषक देण्यात आले. नेपथ्य - प्रथम - सुशांत तांबे (लाडाची लेक)-रोख ७५० आणि चषक, प्रकाश योजना - शाम चव्हाण (ओल्या भिती)-रोख ७५० आणि चषक, पार्श्वसंगीत-कलमेश मेस्त्री, मिहिर मेस्त्री, ओंकार म्हसके (वाल्मिकी)-रोख ७५० आणि चषक देऊन गौरविण्यात आले.
बक्षिस वितरण प्रसंगी परीक्षक ज्ञानेश मुळे, रविदर्शन कुलकर्णी, कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र खांबकर, उपाध्यक्ष संजय पुनाळेकर, खजिनदार सुनिल रेडकर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.