सावंतवाडी : दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित 'उडान महोत्सव २०२३' जल्लोष नववर्षाचा या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी दररोज बहारदार गीत व नृत्याचा कार्यक्रम यावेळी होणार आहे.
सावंतवाडीत ३० डिसेंबर ते १ जानेवारी ६.३० ते १०.३० या वेळेत हा महोत्सव होणार आहे.
यात अस्सल मालवणी खाद्य जत्रा, शाकाहारी, मांसाहारी, चिकन, मटण, मंच्युरिअन, केक, भेळ, पाणीपूरी, उसळ, मिसळ, वडे सागोती, पुरणपोळी आईस्क्रीम, आंबोळी आदी खमंग, चमचमीत पदार्थांसह मनोरंजनाची चटकदार मेजवानी आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लबच्या अध्यक्षा रो. विनया बाड, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, नंदू शिरोडकर यांनी केले आहे.