अंजली मेनन दिग्दर्शित आगामी 'वंडर वुमन'चा ट्रेलर प्रदर्शित

नवजात मुलाला या जगात आणण्यासाठी पालकांनी केलेल्या प्रयत्नांचे ]उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 03, 2022 16:51 PM
views 318  views

ब्युरो न्यूज : रॉनी स्क्रूवाला आणि आशी दुआ साराद्वारा निर्मित, वंडर वुमन या चित्रपटात नादिया मोईडू, नित्या मेनन, पार्वती थिरुवोथू, पद्मप्रिया जानकीरामन, सायोनारा फिलिप, अर्चना पद्मिनी आणि अमृता सुभाष यांच्या प्रमुख भूमिका आहेत. निर्मात्यांनी एका अनोख्या मोहिमेसह चित्रपटाची घोषणा केली जिथे कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर पॉझिटिव्ह प्रेगनेंसी किटचे फोटो पोस्ट केले. 


'वंडर वुमन'चा ट्रेलर आपल्याला सुमाना नावाच्या गरोदर महिलांच्या प्रसवपूर्व वर्गात घेऊन जातो जेथे मातृत्वाच्या शेवटच्या टप्प्यातून जात असताना त्यांचे स्वागत केले जाते. नोराच्या भूमिकेत नित्या मेनन, मिनीच्या भूमिकेत पार्वती थिरुवोथू, वेन्नीच्या भूमिकेत पद्मप्रिया जानकीरामन, सायाच्या भूमिकेत सायोनारा फिलिप, ग्रेसीच्या भूमिकेत अर्चना पद्मिनी आणि जयाच्या भूमिकेत अमृता सुभाष असलेला  हा ट्रेलर एक्सपेक्टिंग पेरेंट्ससाठी सुरक्षित आश्रयस्थानाची एक झलक देतो. 


या कथेमध्ये वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील या महिलांमधील नाते आणि जीवनाला सामोरे जाण्याची त्यांची मजेशीर आणि उत्साही पद्धत पाहायला मिळेल. ही महिला पात्रे देशभरातील सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडतील यात शंका नाही. गर्भधारणा आणि त्यांची नवीन मैत्री एकमकेकांना कशी प्रेरणा देते अशी ही कथा त्यांच्या आयुष्यातील एक झलक आहे. एक म्हण आहे, "एक बच्चे को पालने के लिए एक गांव की जरूरत होती है" नवजात मुलाला या जगात आणण्यासाठी पालकांनी केलेल्या प्रयत्नांचे उदाहरण देणारा हा एक उत्तम चित्रपट आहे. 


आरएसव्हिपी (RSVP) आणि फ्लाइंग युनिकॉर्न एंटरटेनमेंट प्रेझेंटेशन, रॉनी स्क्रूवाला आणि आशी दुआ साराद्वारे निर्मित, अंजली मेननद्वारे लिखित व दिग्दर्शित असा हा चित्रपट १८ नोव्हेंबरपासून सोनी लिव्ह (SONY LIV) वर विशेष प्रवाहित होईल.