मुंबई : चित्रपटगृहांचे वैभव पुन्हा एकदा आले आहे. 'पठाण', 'जवान'च्या दमदार यशानंतर आता प्रेक्षक पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे धावताना दिसत आहेत. दरम्यान 'टायगर'ने डरकाळी फोडल्याने 'पठाण' आणि 'जवान'चा विक्रम संकटात सापडला आहे.
बुधवारी सुपरस्टार सलमान खानने 'टायगर'चा निरोप साऱ्या जगाला दिला. सोप्या शब्दात सांगायचे तर 'टायगर ३' चा टीजर रिलिझ झाला आहे. 'टायगर'ने ज्या पद्धतीने देशाकडून त्याचे चारित्र्य प्रमाणपत्र मागितले आहे, ते पाहता यावेळी 'टायगर' नक्की देशप्रेमी आहे की 'देशद्रोही' हे समजत नाही आहे. त्यामुळे त्याचे चाहते बुचकळ्यात सापडले आहेत. त्यामुळे 'टायगर' पुन्हा धमाका करण्याच्या तयारीत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
''जबतक टायगर मरा नही...तबतक टायगर हारा नही...'' हा डायलॉग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे हा डायलॉग स्वतः सलमान खानने लिहिला आहे. टायगर ३ चे अॅक्शन सीन खास तयार करण्यात आले आहेत.
'पठाण', 'जवान'चे विक्रम संकटात
चार वर्षांनंतर पुनरागम करणाऱ्या शाहरुख खानच्या 'पठाण' आणि 'जवान'ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. 'पठाण' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. मात्र, शाहरुखने जवानच्या माध्यमातून स्वत:चाच विक्रम मोडला. 'गदर २' आणि 'पठाण' दोघेही जवानसमोर टिकू शकले नाहीत. जवानाच्या कमाईने जगभरात १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पण टायगरची स्टाईल पाहता त्याच्यासमोर 'पठाण' आणि 'जवान' या दोघांचे विक्रम संकटात आले आहेत, असे वाटते. चाहते टायगर ३ साठी ९०-१०० कोटी रुपयांची ओपनिंगची अपेक्षा करीत आहेत. मात्र हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.