नव्या वर्षात स्क्रीनवर झळकताना दिसणार बॉलीवूडच्या 'या' नवीन जोड्या !

अनेक नवीन जोड्या दर्शकांच्या भेटीला
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 05, 2022 17:38 PM
views 460  views

ब्युरो न्यूज : सिने प्रेमी नेहमीच नवनवे आणि मनोरंजक चित्रपटांची वाट पाहत असतात. तसेच, आपल्या आवडत्या कलाकाराला लोकप्रिय स्टारसोबत स्क्रीनवर पाहताना त्यांना आनंद होतो. अशातच, २०२३ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत विविध शैलीतील चित्रपटांमध्ये अनेक नवीन जोड्या दर्शकांच्या भेटीला येणार असून या नव्या युगात कोणास ठाऊक शाहरुख खान-काजोल किंवा अक्षय कुमार-रविना टंडन यांसारखी केमिस्ट्री पाहायला मिळेल. तर पाहूयात कोण आहेत बॉलीवूडच्या या नवीन ऑनस्क्रीन जोड्या.  


सारा अली खान आणि विक्रांत मॅसी - गॅसलाइट

'गॅसलाइट'या चित्रपटात सारा अली खान आणि विक्रांत मॅसी हे दोघेही पहिल्यांदाच स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत. अशातच, चाहते या नवीन जोडीला एकत्र पाहण्यासाठी आतुर असतानाच, सारा आणि विक्रांत या दोघांनीही गुजरातमधील एका सुंदर ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे.


समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा - कुशी

भारतातील सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक म्हणून ओळखले जाणारे, समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा हे त्यांच्या आगामी तेलुगू रोमँटिक कॉमेडी 'कुशी'सह प्रेक्षकांना आणि त्यांच्या चाहत्यांना सरप्राईज देताना दिसतील.


प्रभास आणि क्रिती सॅनन - आदिपुरुष

क्रिती सॅनन निःसंशयपणे बी-टाऊनमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक असून, ती एकापाठोपाठ एक चित्रपट करत आहे. अशातच, क्रितीला आगामी चित्रपट 'आदिपुरुष'मध्ये पॅन-इंडिया स्टार प्रभाससोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना पाहायला मिळेल. क्रिती आणि प्रभास यांना पहिल्यांदाच स्क्रीनवर एकत्र पाहायला मिळणार असून, या मायथॉलॉजिकल ड्रामाच्या फर्स्ट लूकने चाहत्यांचा उत्साह वाढवला आहे. 


श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर - लव रंजनचा अनटायटल्ड चित्रपट

लव रंजनच्या आगामी चित्रपटात श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच स्क्रीन स्पेस शेअर करत असल्याच्या घोषणेने चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. इतकंच नाही तर चित्रपटाच्या सेटवरील स्टार्सच्या वायरल झालेल्या फोटोंमुळे प्रेक्षक आता त्यांना ऑनस्क्रीन पाहण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत.


दिशा पटानी आणि सिद्धार्थ मल्होत्रा - योद्धा

बॉलीवूडची सर्वात हॉट आणि फिटेस्ट अभिनेत्री दिशा पटानी एमएमए मध्ये ट्रेनिंग करत असून, तिने जिम वर्कआउट्सदेखील वाढवले ​​आहेत. तसेच, ती हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन सीनसाठी रिहर्सल करण्यात व्यस्त असताना, सिद्धार्थ मल्होत्रा अभिनित बहुप्रतिक्षित आगामी चित्रपट 'योद्धा'साठी प्रेक्षकांची अपेक्षा आणखी वाढली आहे.


कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन - 'शेहजादा'

कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन अभिनित आगामी चित्रपट 'शेहजादा'चा टीझर प्रदर्शित झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये दोन्ही स्टार्स अनोख्या अवतारात दिसत असून या दोन्ही कलाकारांना 'लुका छुपी' नंतर पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तसेच, हा चित्रपट एक जबरदस्त अ‍ॅक्शन ड्रामा एंटरटेनर असून, कार्तिक आणि क्रितीला स्क्रीनवर एकत्र पाहण्यासाठी दर्शक प्रतीक्षा करत आहेत.