देवगड: वेंगुर्ल्यात मिळालेल्या तुफान प्रतिसादा नंतर अभिनेता अंशुमन विचारे प्रमुख भूमिकेत असलेल्या "वाकडी तिकडी" या नाटकाची टीम पुन्हा कोकणात दाखल होणार असून देवगड- जामसंडेत धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे.
समुद्रमंथन निर्मित, श्रमेश बेटकर लिखित तुफान विनोदी नाटक "वाकडी तिकडी" चा प्रयोग २६ जानेवारी २०२३ रोजी जामसंडे येथील कै. मो.ज. गोगटे सांस्कृतिक भवन याठिकाणी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या नाटकात प्रसिद्ध विनोदी अभिनेता अंशुमन विचारे हा प्रमुख भूमिकेत असून सहकलाकार उदय नेने, सचिन वळंजू, दीपक गोडबोले, नरेंद्र केरकर, अनिल शिंदे, अजिंक्य नंदा, हर्षदा बामणे हे भूमिका साकारणार आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन अंशुमन विचारे व श्रमेश बेटकर यांनी केले असून नेपथ्य संदेश बेंद्रे, संगीत सत्यजित रानडे, प्रकाशयोजना अमोघ फडके व सूत्रधार दीपक गोडबोले आहेत.
या नाटकाचा शुभारंभ हा वेंगुर्ल्यात झाला होता तर नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाला तुफान प्रतिसाद मिळत नाटक हाऊसफुल्ल झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रात तुफान चाललेले हे वाकडी तिकडी नाटक आता पुन्हा एकदा कोकणात दाखल झाले असून देवगड जामसंडे मध्ये या नाटकाचा ७० वा प्रयोग होणार आहे. हे नाटक म्हणजे तीन मित्रांची गोष्ट असून जे मुंबई सारख्या शहरामध्ये कामानिमित्त व शिक्षणानिमित्त ग्रामीण भागातून आलेले आहेत. हे मित्र बॅचलर असल्यामुळे सहसा त्यांना राहायला भाड्यावर जागा मिळत नाही. आणि त्या जागा मीपवण्यासाठी त्यांनी वाकड्या तीकड्या मार्गाने केलेली बनवाबनवीने प्रेक्षक हसून लोटपोट होतात. तरी या नाटकाची तिकीट विक्री ति. वी समर्थ मुद्रालाय व सांस्कृतिक भवन येथे सुरू आहे. फोन बुकिंगसाठी ९८१९५८५३५८ व ७५८८५६८७८० (गुगल पे) याठिकाणी सुरू आहे. तरी सर्व नाटक रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.