काही महिन्यांपूर्वी ‘झी मराठी’वरील ‘लोकमान्य’, ‘लवंगी मिरची’ या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता आणखी एक मालिका ऑफ एअर झाली आहे. रोशन विचारे, सानिया चौधरी, शरद पोंक्षे, किशोरी अबिये अभिनीत ‘दार उघड बये’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.