कणकवली - कणकवली पर्यटन महोत्सव च्या शेवटच्या दिवशी 8 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे, रोहित राऊत व सलमान अली नाईट ने कणकवली पर्यटन महोत्सवाची सांगता होणार आहे. कणकवली पर्यटन महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच दिग्गज कलाकारांची रेलचेल कणकवलीत सुरू झाल्याने कणकवली वासियांना हा महोत्सव खऱ्या अर्थाने अविस्मरणीय असा ठरला आहे. त्यातच शेवटच्या दिवशी बेला शेंडे, रोहित राऊत व सलमान आली यांच्यासह अन्य दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत पर्यटन महोत्सव लक्षवेधी ठरणार आहे. या दृष्टीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून नियोजन करण्यात आले आहे. कणकवली पर्यटन महोत्सवाच्या या शेवटच्या दिवशी दिग्गज कलाकारांसह नेते मंडळींची देखील उपस्थिती राहणार आहे.