'फोनभूत'च्या कलाकारांनी आयआयटी बॉम्बेला भेट देत विद्यार्थ्यांसोबत केली धमाल

4 नोव्हेंबर रोजी चित्रपट होणार प्रदर्शित
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 31, 2022 18:56 PM
views 269  views

मुंबई : बहुप्रतीक्षित आगामी चित्रपट 'फोनभूत'चा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला असून, कॅटरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी, आणि ईशान खट्टर यांची पडद्यावरील केमिस्ट्री पाहण्यासाठी दर्शक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा असतानाच कॅटरिना, सिद्धांत, आणि ईशान यांनी आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) येथे भेट दिली. या भेटीदरम्यान कलाकारांनी आयआयटी बॉम्बे (IIT Bombay)च्या विद्यार्थ्यांशी डान्स करत, संवाद साधत, ते स्टार्टअपच्या कल्पनेवर चर्चा करण्यापर्यंत, विद्यार्थ्यांसोबत धमाल केली. 


स्टेजवर चित्रपटातील जगातील सर्वात सुंदर भूत कॅटरिना कैफ आणि दोन 'घोस्टबस्टर्स' इशान आणि सिद्धांत यांना पाहून विद्यार्थ्यांना खरोखरच आनंद झाला. कलाकारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तसेच त्यांनी चित्रपटातील 'काली तेरी गट्ट' गाण्यावर डान्सही केला. याशिवाय, कलाकारांनी भूत दुनियेतील भुतांना मदत करण्यावर लक्ष केंद्रित करणार्‍या चित्रपटात स्टार्टअप कसे चालवतात हे देखील सांगितले. तसेच, उपस्थित दर्शकांनी जेव्हा 'हाउ इज द जोश'चे नारे लावले तेव्हा को-स्टार्स कॅटरिनाला विकी कौशल च्या नावाने चिडवताना दिसले.



गुरमीत सिंगद्वारे दिग्दर्शित आणि रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ लिखित, 'फोनभूत' एक्सेल एंटरटेनमेंटद्वारे निर्मित आहे, ज्याचे प्रमुख रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर असून, हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.