
कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळच्या वतीने आयोजित 'तारका' या डान्स शोचे आयोजन शनिवार, १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे करण्यात आले आहे. उमेश पाटील निर्मित हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
'सुंदरी' फेम प्रसिद्ध नृत्यांगणा दीक्षा नाईक यांच्यासह १४ प्रतिभावान नर्तक आपल्या कलेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. नृत्यांगणा दीक्षा नाईक यांच्यासोबत संजना पवार, साक्षी परब, सिमरन नायर, दुर्वा परब, विशाखा धामापूरकर, तनिषा नाईक, सलोनी सावंत, अंतरा ठाकूर, प्राची जाधव, युक्ती हळदणकर, चिन्मयी सावंत, निधी केळुसकर, प्राची पाटकर आणि निखिल कुडाळकर हे कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
अकॅडमीच्या २१ व्या वर्षांत पदार्पणानिमित्त हा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे सल्लागार सुनील भोगटे आणि अध्यक्ष तथा नृत्य दिग्दर्शक रवी कुडाळकर यांनी दिली. दोन तास चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध नृत्य प्रकार सादर केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन भोगटे आणि कुडाळकर यांनी केले आहे.