मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी (14 ऑक्टो.) हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर, श्रेयसला मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्याच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. रूग्णालायता त्याच्यावर उपचार सुरू होते. श्रेयसला डिस्चार्च मिळाला आहे.श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्ट मध्ये श्रेयसच्या हेल्थची अपडेट दिली आहे. दीप्तीने सोशल मीडियावर तीचे आणि श्रेयसचे फोटो पोस्ट करत, पोस्टमध्ये लिहलं आहे की, “अविश्वसनीय सपोर्टसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहे. तुमचे संदेश माझ्यासाठी आधारस्तंभ आहेत. मी कदाचित वैयक्तिकरित्या प्रत्येकाला वैयक्तिक मेसेज करु शकत नसेल, परंतु प्रत्येकाचे मनापासून धन्यवाद” असे लिहिले आहे.