कुडाळ : कोकण म्हटलं की समोर येते ते म्हणजे कलावंतांची मांदियाळी ! अर्थातच कोकणच्या सांस्कृतिक इतिहासात डोकावत असताना असे लक्षात येते की, कोकणातील कलावंतांनी आपापल्या कलेने जागतिक पातळीवर आपली छाप सोडली आहे. गेली दहा ते पंधरा वर्ष आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिनेमा आणि मालिकांच्या चित्रीकरणाचा सपाटा सुरूच आहे. त्या सिने आणि मालिकांमध्ये अभिनय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या सिंधुदुर्गातील हजारो कलाकारांना साई जळवी फिल्म्सच्या माध्यमातून एक उत्तम व्यासपीठ निर्माण झाले आहे. याच अनुषंगाने नृत्य प्रेमींसाठी कविलकाटे येथील श्री सिद्धिगणपती मंदिराच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 23 जानेवारी 2023 रोजी सायं ठीक 7 वाजता सिने मालिका सृष्टीतील अनेक कलाकारांच्या उपस्थितीत कविलकाटे ग्रामसेवक संघ निर्मित आणि साई जळवी फिल्मस् प्रस्तुत कोकणचा महाडान्सर ही भव्य दिव्य सोलो आणि जोडी डान्स स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेमध्ये १५ वर्षावरील नृत्य कलाकारांना सहभाग घेता येईल. प्रथमच कुडाळ शहरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ह्या नृत्य स्पर्धेसाठी सिनेमालिका क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेता आणि अभिनेत्री उपस्थित राहणार असून या स्पर्धेचे सूत्रसंचालन देश विदेशात गाजलेले सुप्रसिद्ध निवेदक किरण खोत, मुंबई हे करणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक २५०००/_ द्वितीय क्रमांक १११११/_ तृतीय क्रमांक ५५५५/_ उत्तेजनार्थ २१११/_ आणि सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र आणि आकर्षक सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नृत्य कलाकारांनी खाली दिलेल्या क्रमांकावर किमान दोन ते तीन मिनिटांचा आपला ऑडिशन डान्स व्हिडिओ दि. १५ जाने. २०२३ च्या आत पाठवायचा आहे. आलेल्या ऑडिशन मधून २५ ते ३० स्पर्धक या स्पर्धेसाठी निवडले जाणार आहेत आणि निवडलेल्या स्पर्धकांना हजारो प्रेक्षकांच्या आणि सेलिब्रिटी परीक्षकांच्या समोर आपली कला सादर करायला मिळणार. खास म्हणजे ह्या भव्य दिव्य डान्स स्पर्धेचे मीडिया पार्टनर म्हणून कोकणचे नंबर 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE सहभागी झालेले आहे. तरी श्री सिध्दीगणपती मंदिर, कविलकाटे, कुडाळ येथे होणाऱ्या ह्या कोकणचा महाडान्सर ह्या स्पर्धेत जास्तीत जास्त नृत्यांगनानी सहभाग घ्यावा, असे आवाहन दिग्दर्शक, फिल्म लाईन प्रोड्यूसर तथा कोकण कला केंद्र अध्यक्ष साईनाथ जळवी यांनी केले आहे.
संपर्क : 7506419766, 8669054396